विदर्भ हाय-टेक नर्सरीमध्ये विविध भाजीपाला पिकांची निरोगी व गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध आहेत. तसेच आधुनिक पॉलीहाऊस आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रोपांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जाते.
उपलब्ध रोपे पहा२०२१ पासून शेतकऱ्यांच्या सेवेत
आमच्याबद्दल
उत्तम रोपे, निरोगी पीक आणि शेतकऱ्यांचा विश्वास — हीच आमची ओळख!
विदर्भ हाय-टेक नर्सरी ही शेतकऱ्यांना उच्च दर्जाची, निरोगी आणि मजबूत रोपे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. आमची रोपवाटिका शेतकरी आणि बागायतीप्रेमींसाठी दर्जेदार, निरोगी व मजबूत भाजीपाला रोपे उपलब्ध करून देण्याचे काम करते. आधुनिक पद्धतीने तयार केलेली आणि योग्य निगा राखलेली रोपे देऊन शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनासाठी सुरुवातीपासूनच मजबूत पाया मिळावा, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी, फ्लॉवर आणि विविध हंगामी पिकांची दर्जेदार रोपे आमच्याकडे उपलब्ध आहेत. रोपांची गुणवत्ता, योग्य वाढ आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रोपे तयार करण्यावर आमचा भर आहे.
चांगल्या पिकाची सुरुवात चांगल्या रोपापासून होते, म्हणून प्रत्येक रोप काळजीपूर्वक तयार करून आपल्या शेतापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
आमची वैशिष्ट्ये
उपलब्ध रोपांचे प्रकार
फुलकोबी
मिरची
टमाटर
पत्ता कोबी
शिमला मिरची
वांगे
काकडी
भोपळा
कारले
दोडका
कलिंगड
खरबूज
पपई
शेवगा
झेंडू
आम्हालाच का निवडावे?
निरोगी व गुणवत्तापूर्ण रोपे
चांगली मुळे व निरोगी पानांमुळे रोपांची शेतात लागवडीनंतर वाढ चांगली होते.
पॉलीहाऊसमधील नियंत्रित वाढ
समान वातावरणामुळे रोपांची वाढ एकसमान आणि जोमदार होण्यास मदत होते.
ऑटो सोइंग मशीन
अचूक व एकसमान पेरणीमुळे रोपांची गुणवत्ता आणि वाढ अधिक समान राहण्यास मदत होते.
मोठी विविधता
अनेक पिके आणि वाण उपलब्ध असल्याने आपल्या शेतासाठी योग्य पर्याय निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळते.
शेतापर्यंत पोहोचवण्याची सुविधा
उपलब्धतेनुसार रोपे थेट शेतापर्यंत पोहोचल्याने वेळ, प्रवास आणि वाहतुकीचा त्रास कमी होतो.
तुमच्या पुढील पिकासाठी रोपे हवी आहेत?
आमचा पत्ता :
विदर्भ हाय-टेक नर्सरी
नागपूर–छत्रपती संभाजीनगर रोड, नायरा पेट्रोल पंपाच्या मागे
कारंजा (लाड), जि. वाशिम, महाराष्ट्र









